सिंहगड रोड परिसरात गुन्हे शाखा युनिट ३ ची मोठी कारवाई! गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक केली आहे.


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

सिंहगड रोड परिसरात गुन्हे शाखा युनिट ३ ची मोठी कारवाई!

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक केली आहे.

दि. २९/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे पथक सिंहगड रोड, नांदेड सिटी, वारजे व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार कैलास लिम्हण यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून गणेश सतिश रणखांब (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) याला सिंहगड सृष्टीजवळ, टि-पॉईंट चौक, एनडीए खडवासला रोडलगत टपरीजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून

👉 ०१ पिस्टल

👉 ०२ जिवंत काडतुसे

अवैधरित्या बाळगल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धडाकेबाज कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. निखिल पिंगळे व मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे यांच्यासह युनिट ३ च्या पथकाने पार पाडली.

पुणे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा करारा वचक कायम! 👮‍♂️🔥

#BreakingNews #PuneCrime #SinhgadRoad #UttamnagarPolice #CrimeBranchUnit3 #IllegalPistol #GunSeizure #PunePolice #PoliceAction #LawAndOrder #MarathiNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!