🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨
स्वारगेट परिसरात अवैध हुक्का पार्लरवर मोठी कारवाई!
स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत लक्ष्मीनारायण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डिंगमधील ‘एलडिनेरो हॉटेल’ येथे अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी धडक कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकला असता, हॉटेलचे शटर आतून बंद असल्याचे आढळून आले. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने शटर तोडून आत प्रवेश करण्यात आला.
छाप्यात हॉटेलमध्ये तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, चिलीम, प्रतिबंधित साहित्य तसेच ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन बेकायदेशीररित्या हुक्का सेवन करून घेत असल्याचे स्पष्ट झाले.
👤 मुख्य आरोपी :
▪️ प्रतिक विकास मेहता – हॉटेल मालक
▪️ सनी सुंदर परिहार – हॉटेल मॅनेजर
▪️ ५ वेटर कर्मचारी
या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशन गु.रजि.नं. २०/२०२६ अन्वये
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३ तसेच
सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💰 एकूण ₹२२,५६०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई
मा. अपर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र बनसोडे,
मा. पोलीस उपआयुक्त श्री मिलिंद मोहिते,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे
यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
🔖
#Hashtags
#BreakingNews #PunePolice #SwargatePolice
#HookahParlorRaid #IllegalHookah
#PuneCityNews #CrimeNews
#PoliceAction #PublicHealth
#NoTobacco #MaharashtraPolice
#ElDineroHotel #ModiPlaza
#LawAndOrder #PuneUpdate 🚔🔥








