लोणी काळभोर पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई! 🚔


🚨 ब्रेकिंग न्यूज! 🚨

लोणी काळभोर पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई! 🚔

दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, थेऊर फाटा – केसनंद रोडवर पोलिसांनी सापळा रचून गावठी हातभट्टी दारू वाहतूक करणारा पांढरा महिंद्रा पिकअप (MH12 MV 5017) ताब्यात घेतला!

वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये २१०० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (किंमत ₹२,१०,०००/-) व वाहनासह एकूण ₹१०,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे 🍾🚫

वाहन चालक सोमनाथ सुरेश राखपसरे (वय २९, रा. दहीटणे, ता. दौंड) यास अटक करण्यात आली असून, त्याने दारू गणेश चव्हाण (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्या हातभट्टीवरून आणल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. डॉ. राजकुमार शिंदे (उप पोलीस आयुक्त, परि-५), मा. सौ. अनुराधा उदमले (सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

👏 उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी :

  • पो.उ.नि. रत्नदिप बिराजदार
  • पो.उ.नि. दिगंबर सोनटक्के
  • पो.हवा. दिगंबर जगताप
  • पो.शिपाई अमोल जाधव

#लोणीकाळभोरपोलिस #दारूबंदीकारवाई #पुणेपोलिस #BreakingNews #CrimeUpdate #MahaPoliceNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!