गुन्हे शाखा युनिट-६ ची मोठी कामगिरी! 🚔 हडपसर परिसरातील सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद! 🔥


🛑 ब्रेकिंग न्यूज 🛑

गुन्हे शाखा युनिट-६ ची मोठी कामगिरी! 🚔

हडपसर परिसरातील सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद! 🔥

पुणे (प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार हडपसर परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपींवर लक्ष ठेवत असताना, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हंसराजसिंग उर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) या सराईत घरफोडी करणाऱ्यास सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

झडती दरम्यान आरोपीकडून

🔹 देशी बनावटीचे पिस्तूल

🔹 एक रिकामी मॅगझिन

🔹 एक जिवंत काडतूस

🔹 तसेच १५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ₹१७,८१,०००)

असा एकूण ₹१८,२२,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 💰

आरोपीवर हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९५४/२०२५, भा.ह.का. कलम ३(२५) सह म.पो.का. ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात त्याचा सहकारनगर, चिखली व भोसरी MIDC येथील घरफोडीच्या तीन गुन्ह्यांमध्ये सहभाग उघड झाला आहे.

सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण (युनिट ६) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या धडाकेबाज कारवाईत सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी सहभाग घेतला 👮‍♂️👏

#PunePolice #CrimeBranchUnit6 #BreakingNews #Hadapsar #PuneCrime #PoliceAction #GunheShakha


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!