🚨 ब्रेकिंग न्यूज | उरुळी कांचन 🚨
सराईत गावठी हातभट्टीवाला क्रिश राठोडवर एमपीडीएची कडक कारवाई करण्यात आली असून त्यास अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
हवेली तालुक्यात गावठी हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री व बेकायदेशीर वाहतूक करून परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. आगामी नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे यावरून स्पष्ट होते.
उरुळी कांचन पोलीस ठाण्यात यापूर्वीही दारूबंदी अधिनियमांतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेल्या राठोडकडून तक्रारदारांना धमकावणे, चोरीने भट्ट्या उभारणे व अवैध दारूविक्रीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरवली जात होती. अखेर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करत गुन्हेगारीवर करारी घाव घातला आहे.
📌 १३ डिसेंबर रोजी विशेष पथकाने राठोडला ताब्यात घेऊन अमरावती कारागृहात दाखल केले.
📌 पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत.
🔴
#BreakingNews
#UruliKanchan #MPDAAction #PuneRuralPolice #Hathbhatti #IllegalLiquor #CrimeNews #PoliceAction #LawAndOrder #PublicSafety #MaharashtraNews #HaveliTaluka #AmravatiJail #ElectionSecurity #AntiCrimeDrive #StrictAction #CrimeFreeMaharashtra #PoliceOnAlert #RuralCrime #BigAction #NewsUpdate








