रस्त्याने जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून मारहाण करत सोन्याची चैन लुटणाऱ्या चोरास वानवडी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई!

रस्त्याने जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून मारहाण करत सोन्याची चैन लुटणाऱ्या चोरास वानवडी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.

दि. 12 डिसेंबर 2025 रोजी रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, हडपसर येथे मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार अनोळखी आरोपींनी एका वयोवृद्ध इसमाला अडवून बेदम मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून फरार झाले होते.

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 506/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

👮‍♂️ सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांचा थरारक शोध

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध सुरू असतानाच दि. 18/12/2025 रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील छोट्या पुलावर निर्जन ठिकाणी थांबलेल्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून पकडले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

👉 उमर नुर खान (वय 18 वर्षे, रा. नवाधिश पार्क, कोंढवा, पुणे)

त्याच्या अंगझडतीत 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीवा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे.

👏 वानवडी पोलिसांच्या तत्परतेचे आणि उत्कृष्ट तपासाचे कौतुक

ही कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने यशस्वीरीत्या केली.

🚔 पुणे शहर पोलिसांचा ठाम इशारा — गुन्हेगारांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही!

🔥 

#Hashtags

 🔥

#BreakingNews #PunePolice #WanwadiPolice #CrimeNews #SeniorCitizenSafety #GoldChainSnatching #RobberyCase #AccusedArrested #PoliceAction #CCTVInvestigation #QuickAction #PuneCity #LawAndOrder #CrimeControl #MarathiNews #PoliceAlert #PublicSafety #Hadapsar #Ramtekdi #JusticeServed 🚨


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!