जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून – येवलेवाडी पोलिसांनी १२ तासात आरोपींना केले जेरबंद


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून – येवलेवाडी पोलिसांनी १२ तासात आरोपींना केले जेरबंद

पुणे शहरातील येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खळबळजनक खुनाच्या घटनेत पोलिसांनी अवघ्या १२ तासात मुख्य आरोपींना ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे.

येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी) याचा जुन्या वादाच्या कारणावरून रस्ता अडवून एकूण सात आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.

या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या आदेशानुसार तात्काळ दोन तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी

👉 आदित्य सुभाष गायकवाड (१९)

👉 गणेश किशोर मोरे (२०)

👉 कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे (१९)

या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि. ०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

🔖 

हॅशटॅग्स

#BreakingNews #PuneCrime #YeolewadiPolice #MurderCase #PunePolice #CrimeNews #SwiftAction #LawAndOrder #12HoursAction #PoliceSuccess


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!