🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴
वॉरंट बजावणीसाठी ५ हजारांची लाच; हवालदार एसीबीच्या सापळ्यात अटक!
📍 वाघोली, पुणे — वॉरंट बजावणीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वाघोली पोलिस ठाण्यातील हवालदार परमेश्वर माणिक पाखरे (वय ३७) यांना आज एसीबीने रंगेहात पकडले.
तक्रारदार महिलेच्या पतीवर ६.७५ लाखांची पोटगी थकबाकी होती. न्यायालयाने दिलेल्या जप्ती वॉरंटच्या बजावणीसाठी पाखरे यांनी लाच मागितली होती. तक्रारदार महिलेने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला.
आज (२५ नोव्हेंबर) दुपारी पोलिस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीवर लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले. पुढील तपास सुरू.
📌 Hashtags:
#BreakingNews #PuneNews #Wagholi #ACBAction #LachPakat #AntiCorruption #PunePolice #CrimeUpdate #WarrantBazavani #CorruptionCase #ACBPune #MaharashtraNews #LiveUpdates #LatestNews #PoliceHawaldarCaught








