युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद!


🚨 ब्रेकिंग न्यूज – पुण्यात मोठी कारवाई! 🚨

युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर

दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद!

आंबेगाव पोलिस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर क्र. 246/2025 मधील आरोपी करण रवि पटेकर ऊर्फ कोळगे (वय 22) याला अखेर दरी पुलाखाली लपून बसताना अटक करण्यात आली. आरोपीवर भा.दं.वि. 310(4), 310(5), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), शस्त्र कायदा 4(25) यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

युनिट २च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या या कारवाईनंतर आरोपीस आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदार मोकाशी, राख, पवार, टकले, नेवसे, चव्हाण, रसगर, कुंभार, आबनावे, दळवी, थोरात, मांढरे, शेख, तांबोळी व ताम्हाणे यांचा सक्रिय सहभाग होता.

Hashtags

#BreakingNews #PunePolice #CrimeBranchUnit2 #Ambegaon #WantedAccusedArrested #PoliceAction #PuneCity #CrimeControl #MaharashtraPolice #DacoityCase #LawAndOrder #PuneUpdates #CrimeNews #PoliceForce #SafetyFirst


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!