चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत बिरडवडी गाव परिसरात एक धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे.


🚨 ब्रेकिंग न्यूज | चाकण उत्तर पोलीस स्टेशन 🚨

चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत बिरडवडी गाव परिसरात एक धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे.

दि. 11 जानेवारी 2026 रोजी सायं. 4.45 वाजण्याच्या सुमारास, बिरडवडी गावातील घर नं. 32 च्या मोकळ्या जागेत अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील अज्ञात पुरुषाचा निर्घृण खून झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अज्ञात आरोपींनी मृताच्या डोक्यावर व तोंडावर दगड अथवा अज्ञात हत्याराने मारहाण करून त्याचा खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी गु.र.नं. 47/2026, BNS कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔍 मृताचे वर्णन :

▪️ वय : 30 ते 35 वर्षे

▪️ उंची : अंदाजे 5.5 फूट

▪️ बांधा : मध्यम

▪️ दाढी-मिशा : होत्या

▪️ केस : मोठे काळे

▪️ कपडे :

▫️ आकाशी रंगाचा जॅकेट

▫️ फुल प्रिंटचा शर्ट

▫️ चॉकलेटी रंगाची बनियन

▫️ राखाडी जीन्स पँट

▫️ चॉकलेटी रंगाची अंडरवेअर

▫️ कंबरपट्टा : करड्या रंगाचा बेल्ट

या खुनाचा तपास सहा. पो. नि. लामाजी कदम, चाकण उत्तर पोलीस स्टेशन करीत असून नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 संपर्क : 9594905013

#BreakingNews

#ChakanNorthPolice

#MurderCase

#Biradwadi

#PuneCrime

#UnknownDeadBody

#CrimeAlert

#PoliceInvestigation

  1. #JusticeForVictim

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!