बाणेर लॉज आणि कोंढव्यातील मसाज पार्लरवर पोलिसांचे धडक कारवाई – अनेक तरुणींची सुटका, दोन व्यवस्थापक अटकेत


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुण्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश 🚨

बाणेर लॉज आणि कोंढव्यातील मसाज पार्लरवर पोलिसांचे धडक कारवाई – अनेक तरुणींची सुटका, दोन व्यवस्थापक अटकेत

पुणे : बाणेर परिसरातील लक्ष्मणनगर भागात सुरू असलेल्या एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी तातडीने छापा टाकत मोठा खुलासा केला. या कारवाईत लॉज व्यवस्थापक प्रकाश ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह चौघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रयासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करत छापा टाकला आणि तरुणींची सुखरूप सुटका केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सगर, सहायक निरीक्षक लामखेडे, केकाण यांच्या पथकाने केली.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील एका मॉलमधील मसाज पार्लरवरही छापा टाकून मोठा प्रकार उघडकीस आणला. मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अँथोनी विल्सन स्वामी (वय ३९) याला अटक करण्यात आली असून, मसाज पार्लर चालवणाऱ्या महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुण्यात पुन्हा एकदा वाढत चाललेल्या देहविक्रयाच्या रॅकेटविरोधात पोलिसांची ही ठोस कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

🔖 हॅशटॅग्स

#BreakingNews #PuneCrime #BanerRaid #KondhwaRaid #HumanTrafficking #PITAAct #PunePolice #SexRacketBusted #PoliceAction #BanerNews #NIBMroad #CrimeNewsMarathi #PuneBreaking


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!