निष्ठावंताने शरद पवारांची साथ सोडली – प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुण्यात जबर धक्का!


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे राजकारणात मोठा भूकंप 🚨

निष्ठावंताने शरद पवारांची साथ सोडली – प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुण्यात जबर धक्का!

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पुणे महानगरपालिकेसमोर पत्रकार परिषद घेत शहराध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला.

२७ वर्षांपासून पुरोगामी विचारांसाठी सामाजिक-राजकीय चळवळीत कार्यरत असलेले जगताप म्हणाले,

“मी कोणत्याही पदासाठी नाही तर पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी काम करत आलो. आजही तेच माझे ध्येय आहे. मी राजकारणातून बाहेर जात नाही, नगरसेवक पदाची निवडणूक लढवणारच.”

जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी सलग दोन दिवस चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील संभाव्य युतीला त्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध हाच त्यांच्या राजीनाम्यामागील प्रमुख कारण असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“एका पराभवाने मी घाबरणारा नाही. विधानसभेत पराभव झाला, तरी माझा जनतेवरचा विश्वास कायम आहे. कार्यकर्त्यांची घालमेल पाहून माझा अंतर्मन अस्वस्थ झाला आणि म्हणूनच हा निर्णय घेतला,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.

या संपूर्ण घडामोडीमुळे येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा हादरा बसला असून, आगामी स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

🔖 हॅशटॅग्स

#PrashantJagtap #SharadPawar #NCPBreaking #PunePolitics #PuneNews #MaharashtraPolitics #PoliticalEarthquake #BreakingMarathi #NCPShock #PMC_Elections #LocalBodyElections #SharadPawarGroup #AjitPawar #SupriyaSule


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!