ओढ्यात कुजलेल्या अवस्थेत गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसर हादरला


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

💀 ओढ्यात कुजलेल्या अवस्थेत गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसर हादरला 💀

भिगवण (बारामती): बारामती-अहिल्यानगर रोडवरील मदनवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे 😱.

चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिकांनी धस्स केले 😨.

🔍 प्राथमिक तपासात पोलिसांनी खून करून मृतदेह ओढ्यात टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मृत महिला अंदाजे २५ ते ३० वर्षांची असून, तिच्या डाव्या हातावर ‘रविराज’ असा टॅटू असल्याचे आढळले आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे ती ६ ते ७ महिन्यांची गरोदर होती 🤰.

स्थानिकांना दुर्गंधी जाणवल्यानंतर त्यांनी पुलाखालून पाहणी केली असता चादरीत गुंडाळलेला मृतदेह दिसला व तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली 🚓.

या घटनेने दौंड-भिगवण परिसर हादरून गेला असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत 🔎.


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!