🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴
उरुळीकांचन खून प्रकरण उघडकीस! युवतीचा खून करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात 🚨
पुणे ग्रामीण | उरुळीकांचन पोलीस स्टेशन हद्दीतील गगन आकांक्षा सोसायटीजवळ दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुनम विनोद ठाकूर (वय २०, रा. कोरेगाव मुळ) हिचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात गंभीर जखम असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखा व उरुळीकांचन पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत तपास पथकाने तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि २५० पेक्षा अधिक व्यक्तींची चौकशी करून अखेर आरोपीचा शोध लावला.
गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळेवस्ती, उरुळीकांचन) या आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत त्याने युवतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने शरीरसुखाची मागणी केल्यावर युवतीने नकार दिल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड मारून खून केला असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (MH12 SZ 6965) जप्त केली असून, आरोपीस न्यायालयात हजर केल्यावर २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या उत्कृष्ट कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळीकांचन पो.स्टे.चे पो.नि. सचिन वांगडे, स.पो.नि. ज्ञानेश्वर बाजीगरे, तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग आहे. 👮♂️👏
#BreakingNews #PuneRuralPolice #UrulikanchanMurderCase #CrimeNews #PoliceAction








