भाईंदर (पूर्व) – कस्तूरी हाईट्समध्ये भीषण आग; मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दलाची जलद कारवाई, 215 नागरिक सुरक्षित बाहेर!


🔥 BREAKING NEWS 🔥

भाईंदर (पूर्व) – कस्तूरी हाईट्समध्ये भीषण आग; मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दलाची जलद कारवाई, 215 नागरिक सुरक्षित बाहेर!

भाईंदर (पूर्व) येथील कस्तूरी हाईट्स, इंद्रलोक फेज 6, आर.बी.के. स्कूल समोर आज दि. 09/12/2025 रोजी सकाळी अचानक लागलेली आग अग्निशमन दलाने अवघ्या 15–20 मिनिटांत नियंत्रणात आणली.

कनकिया अग्निशमन स्थानकाला 11:30 वाजता वर्दी, तर 11:34 ला पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात आग इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागल्याचे स्पष्ट झाले.

आग वेगाने वरच्या मजल्यांकडे पसरत असतानाच कनकिया, स्व. कल्पना चावला, सिल्वरपार्क व नवघर अग्निशमन स्थानकातील एकूण 6 अग्निशमन वाहने, 9 अधिकारी आणि 20 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अदानी इलेक्ट्रिसिटीचा विद्युत पुरवठा व महानगर गॅसची पाईपलाईन तात्काळ बंद करण्यात आली.

धुराचे प्रमाण वाढल्यानंतर इमारतीतील 215 रहिवाशांना सुरक्षित खाली उतरवून बाहेर काढण्यात आले.

धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्यामुळे खालील नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले –

  1. हिमांश दुर्गाधर भट (वय 2.5 वर्षे)
  2. प्रियांका सिंग
  3. अर्पण सिंग
  4. वैभव सिंग
  5. चंद्रिका देवी सिंग
  6. पाल फॅमिली
    तथापि सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

तळ + 12 मजली इमारतीतील 72 सदनिका पूर्ण सुरक्षित ठेवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. कोणतीही जीवितहानी नाही, ही मोठी दिलासादायक बाब.

सदर कारवाईमध्ये प्रमुख अधिकारी, वाहन क्रमांक MH 04 AN 3956, MH 04 E 0935, MH 04 LE 0936, MH 04 AN 3953, MH 04 LE 0938 व TTL वाहन MH 04 E 6868 सहभागी झाले.

मा. आयुक्त श्री. राधाबिनोद शर्मा यांनी तत्काळ सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

अग्निशमन विभागाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे.

🔥 Hashtags

#BreakingNews #MiraBhayandarFire #FireIncident #BhayandarEast #KasturiHeightsFire #FireBrigadeAction #MBMCAgnishaman #FireSafety #EmergencyResponse #ResidentsSafe #MajorFireControl #CityNews #MBMCUpdates #MiraBhayandarNews #QuickAction #NoCasualties #FireRescue #BhayandarUpdates #UrbanSafety #FireControlSuccess


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!