पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ ची मोठी कामगिरी – लष्कर पोलीस स्टेशनच्या गंभीर जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपी जेरबंद!


🔥 BREAKING NEWS 🔥

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ ची मोठी कामगिरी – लष्कर पोलीस स्टेशनच्या गंभीर जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपी जेरबंद!

लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत दि. 20/11/2025 रोजी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसून कर्मचार्‍यांना कोंडून ठेवत धमकावत केलेल्या जबरदस्ती चोरी प्रकरणात मोठी प्रगती. गुन्हा रजि. नं. 195/2025 भा. न्या. सं. कलम 309(5), 127(2), 351(2), 3(5) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

दिनांक 08/12/2025 रोजी गुन्हे प्रतिबंध गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार आजीम शेख व सददाम तांबोळी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून आरोपी जाहिद कमरुदीन शेख (वय 20, रा. लोहियानगर, पुणे) यास लोहियानगर गंजपेठ परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

त्यास तात्काळ लष्कर पोलीस स्टेशनकडे सोपवून दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

ही धडक कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार पार पडली.

कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तसेच पोलीस अंमलदार संजय जाधव, विनोद चव्हाण, शंकर नेवसे, नागनाथ राख, संदीप शिर्के, विशाल दळवी, विजयकुमार पवार, संजय टकले, शंकर कुंभार, संजय आबनावे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, योगेश मांढरे, सर्जेराव सरगर, सददाम तांबोळी, अजीम शेख यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली.

🔻Hashtags

#BreakingNews #PuneCrimeBranch #Unit2Action #LashkarPolice #PoliceAction #CrimeUpdate #PuneCityPolice #WantedAccusedArrested #Gunjepeth #PuneNews #MaharashtraPolice #BigOperation #CrimeControl #SafetyFirst #PoliceSuccess #PuneUpdates #LawAndOrder #CrimeBranchUnit2 #JabardastiChoriCase #FastAction


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!