गावठी दारू वाहतूक करणाऱ्या सराईत इसमावर लक्ष्मीनगर पोलिसांची धडक कारवाई! संगमवाडी – येरवडा परिसरात सापळा रचून सेंट्रो कारसह ₹२,९५,०००/- किंमतीची तयार गावठी दारू व मोबाईल जप्त, आरोपी ताब्यात.


🚨🚓 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚓🚨

गावठी दारू वाहतूक करणाऱ्या सराईत इसमावर लक्ष्मीनगर पोलिसांची धडक कारवाई!

संगमवाडी – येरवडा परिसरात सापळा रचून सेंट्रो कारसह ₹२,९५,०००/- किंमतीची तयार गावठी दारू व मोबाईल जप्त, आरोपी ताब्यात.

मा. पोलीस आयुक्त सो. श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो. श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) सो. श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ–०४ सो. श्री. चिलुमुला रजनिकांत व मा. सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग सो. श्री. सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली.

पोशि २४९२ प्रदीप चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, सपोनि श्री. शिवाजीराव विभुते, सपोनि श्री. सावंत, पोशि १४० ससाने, पोशि १३२२ चुकेवाड, पोशि ८१४ आबगे, पोशि २४३९ गडमवाड यांनी संगमवाडी येथे सापळा रचून सादरबाबा चौकाकडून येणारी सेंट्रो कार क्र. MH-12-DE-9833 ताब्यात घेतली.

कारमधील चालकाने त्याचे नाव संगमेश दयानंद शेटप्पा (वय ३५, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, पुणे) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता ₹२,९५,०००/- किंमतीची गावठी दारू, सेंट्रो कार व Vivo कंपनीचा मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईदरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसून पोलीसांकडून कोणतेही असभ्य वर्तन करण्यात आलेले नाही. पुणे शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांचा कडक धडा सुरूच असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारीवर मोठा आळा बसणार आहे.

🔥 Hashtags 🔥

#BreakingNews #PunePolice #LaxminagarPolice #YerwadaPolice #PuneCrime #IllegalLiquor #GavthiDaroo #PoliceAction #Crackdown #PuneCity #Sangamwadi #Yerwada #LawAndOrder #CrimeControl #PuneUpdates #MaharashtraPolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!