युनिट ६, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – दरोड्याची पूर्वतयारी करणारा व जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे असलेला ‘बचक्या टोळी’तील सराईत गुन्हेगार जेरबंद!


🚨🚓 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚓🚨

युनिट ६, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – दरोड्याची पूर्वतयारी करणारा व जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे असलेला ‘बचक्या टोळी’तील सराईत गुन्हेगार जेरबंद!

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली.

बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्ह्यांमध्ये निष्पन्न पाहिजा असलेला आरोपी राजेश उर्फ ‘चौपाट्या राजा’ बबलू मंगल मंडळ (वय २९, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, मूळ रा. दरवंगा, बिहार राज्य) हा अंगर वाईन परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

हा आरोपी दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी करणाऱ्या कुप्रसिद्ध ‘बचक्या टोळी’शी संबंधित असून सध्या तो मोक्का गुन्ह्यात जामिनावर होता. बंडगार्डन पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. ३५२/२०२५ व ३५०/२०२५ या गंभीर गुन्ह्यांमध्ये तो पाहिजा असल्याने त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नमूद आरोपीवर यापूर्वी पुण्यातील बंडगार्डन, लष्कर व विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चोरी, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, घरफोडी यासारख्या तब्बल ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी भयानक आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे व संपूर्ण पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.

या धडक कारवाईमुळे पुणे शहरात दरोडेखोर व जबरी चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून गुन्हेगारीवर पोलिसांचा करडा वचक कायम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

🔥 Hashtags 🔥

#BreakingNews #PunePolice #CrimeBranchPune #Unit6 #BachkyaGang #ChaupatyaRaja #WantedCriminalArrested #RobberyPreparation #PuneCrime #BundGardenPolice #LashkarPolice #VishrambaugPolice #LawAndOrder #CrimeControl #PoliceAction #PuneCity #MaharashtraPolice #CriminalCaught #PoliceSuccess #PuneUpdates


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!