खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई! हडपसर परिसरात मेफेड्रॉन (एम.डी.) विक्री करणारा आरोपी साजीद असद खान अटकेत. आरोपीकडून १२७ ग्रॅम एम.डी. ड्रग्ससह तब्बल ₹३२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे पोलिसांचा ड्रग माफियांवर जोरदार प्रहार!


 खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर

मेफेड्रॉन (एम.डी) विक्री करणारा इसम अटक, खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेची कारवाई

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत युनिट-५ हद्दित गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीता फिरत असताना गोसावी वस्ती वानवडी पुणे येथुन ससाणे नगरच्या दिशेने जात असताना राजगड पी.एम.ए. व्हाय सोसायटी, हडपसर पुणे या सोसायटी समोर एक काळ्या रंगाची कार नंबर MH-14-DF-3518 संशयीतरित्या उभी असल्याचे दिसले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साजीद असद खान, वय ३५ वर्षे रा. फ्लॅट नंबर २७, ए-१, राजगड सोसायटी, सुरक्षानगर गोसावी वस्ती, हडपसर पुणे. असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची झडीत घेता त्याचे ताब्यात ६२ ग्रॅम ०५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आले तसेच त्याचे राहते घरातुन ६४ ग्रॅम ६४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) असा एकुण १२७ ग्रॅम १४ मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ २५,४२,८००/- रुपये किंमतीचा, अंमली पदार्थ विक्री करुन जमा केलेले रोख रक्कम ३,६०,०००/- रुपये व इतर ऐवज असा एकुण ३२,५४,०००/- रु.कि. मुद्देमाल बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द वानवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ४३४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली खंडणी विरोधी पथक, २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, साहील शेख, चेतन गायकवाड अमोल घावटे, अनिल कुसाळकर, किरण पडयाळ, सुजीत वाघमारे, दिलीप गोरे, चेतन आपटे, आझाद पाटील, गणेश खरात, पवन भोसले व प्रशांत शिंदे, यांनी केलेली आहे.


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!