घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! ८ घरफोडी उघडकीस – तब्बल ₹14 लाखांचा मुद्देमाल जप्त


🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴

#PuneCrime #BreakingNews #PunePolice #AirportPolice #Housebreaking

घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

८ घरफोडी उघडकीस – तब्बल ₹14 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यातील दुचाकीसह तब्बल ₹14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत एकूण ८ घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असून तिघे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

अटकेतील आरोपी –

▪️ शिवम दत्ता अवचर (19)

▪️ नवनाथ उर्फ लखन मोहिते (22)

▪️ विधी संघर्षित बालक नितीन पाटोळे (16)

२९ ऑक्टोबर रोजी दाखल घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात, पोलिसांनी २५०+ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तिघांची ओळख पटवत सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या ताब्यातून—

💠 ₹10 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने

💠 गुन्ह्यातील दुचाकी

तसेच पुढील चौकशीत आणखी ७ घरफोडी मान्य केल्याने अतिरिक्त ₹2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त.

एकूण जप्तीचा आकडा ₹14 लाखांपर्यंत!

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व

पीआय (गुन्हे) शरद शेळके

यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

#CrimeNews #MaharashtraPolice #PuneUpdates #PoliceAction #HousebreakingCase


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!