🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨
निवडणूक काळात हडपसरमध्ये मोठी कारवाई! गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने नाकाबंदी, पेट्रोलिंग व गुन्हेगार तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या कारवाईदरम्यान गोंधळेनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रोहन राजकुमार गायकवाड (वय २० वर्षे, रा. गोंधळेनगर, हडपसर) या रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ₹५१,२००/- किमतीचा शस्त्रसाठा आढळून आला.
याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०९९/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व मपोका कलम ३७(१)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
निवडणूक काळात कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची ही ठोस व धडक कारवाई मानली जात आहे.
🔥
#BreakingNews
#HadapsarPolice #PunePolice #ElectionAlert #IllegalWeapon #CountryMadePistol
#LawAndOrder #PoliceAction #PuneCity #CrimeControl #PMC_Elections
#MCOCA #ArmsAct #PolicePatrolling








