पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई! युनिट–०३ कडून विधीसंघर्षित बालक ताब्यात — गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

युनिट–०३ कडून विधीसंघर्षित बालक ताब्यात — गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हे शाखा पुणे शहरकडून धडक कारवाया सुरू असून, गुन्हे शाखा युनिट–०३ ने मोठी यशस्वी कारवाई केली आहे.

दि. १९/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट–३ चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारु तसेच पोलीस अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार सिंहगड रोड, नांदेड सिटी, नांदेड-धायरी परिसरात पेट्रोलिंग करीत होते.

यावेळी पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक विधीसंघर्षित बालक हा बेकायदेशीररीत्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून नांदेड-धायरी रोडवरील मते प्लॉट, नांदेड, पुणे येथे थांबलेला आहे.

ही माहिती मिळताच तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेत सापळा रचून अत्यंत शिताफीने कारवाई करत त्या विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ०१ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगलेली असल्याचे निष्पन्न झाले असून ती जप्त करण्यात आली आहेत.

सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्या विधीसंघर्षित बालकास न-हे (नांदेड) पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर मोठा आळा बसला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे–१) पुणे शहर श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारु, पोलीस अंमलदार कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, किशोर शिंदे, अमित बोडरे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांनी सहभाग घेतला.

🔴 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त व गुन्हेगारांवर करडी नजर कायम असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

🔖 हॅशटॅग्स:

#BreakingNews #PunePolice #CrimeBranchPune #Unit03 #IllegalWeaponSeized

#GavthiPistol #LiveCartridges #Election2025 #PMC_Election

#LawAndOrder #PuneNews #PoliceAction #NandedDhari #SinhagadRoad


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!