मांजरीतील सराफ दरोडा २४ तासात उघडकीस! ३ आरोपी अटक, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात — सोने-चांदीचे दागिने हस्तगत


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

मांजरीतील सराफ दरोडा २४ तासात उघडकीस! ३ आरोपी अटक, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात — सोने-चांदीचे दागिने हस्तगत

मांजरी येथील “महावीर ज्वेलर्स” दुकानावर झालेल्या थरारक दरोड्याचा गुन्हा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा युनिट-५ व युनिट-६ यांनी अवघ्या २४ तासात उघड केला आहे.

या कारवाईत ३ आरोपी अटक करण्यात आली असून ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात घेण्यात आले आहेत.

🔹 दिनांक 03/01/2026 रोजी पहाटे 5 ते 5.30 दरम्यान 4-5 दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दुकानातील काच फोडत

५२८.८ ग्रॅम सोन्याचे दागिने (₹52.88 लाख) लुटून नेले होते.

🔹 सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या माहितीवरून मांजरी व छत्रपती संभाजीनगर येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

🔹 आरोपींकडून आत्तापर्यंत

224.92 ग्रॅम सोन्याचे दागिने व 183 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत (प्रतवारी बाकी).

ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे व मा. सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, युनिट-५ व युनिट-६ गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

#BreakingNews #ManjariDacoity #PunePolice #CrimeBranch #RobberySolved #JewelleryHeist #Unit5 #Unit6 #AntiRobberySquad #GoldRecovery #PuneCrime #PoliceAction


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!