🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨
मार्केटयार्डमध्ये सराईत गुन्हेगाराकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त!
युनिट २ गुन्हे शाखेच्या कारवाईत १९ वर्षीय प्रथमेश सुरेश पवार (रा. संजयनगर, बिबवेवाडी) यास बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगताना अटक.
त्याच्याकडून १ लोखंडी पिस्टल, मॅगझीन व १ जिवंत काडतूस असा एकूण ₹40,800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 02/2026 नुसार शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.
आरोपीवर यापूर्वीही बिबवेवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल असल्याची माहिती.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे व मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
#BreakingNews #PunePolice #CrimeBranch #Unit2 #MarketYard #IllegalWeapon #ArmsAct #MaharashtraPolice #PuneCrime #PoliceAction #CrimeControl








