मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई! बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणा-या दोन युवकांना अटक; तब्बल ₹1,08,800/- किंमतीचा मांजा जप्त!


🚨 ब्रेकिंग न्यूज – पुणे शहर 🚨

मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई!

बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणा-या दोन युवकांना अटक; तब्बल ₹1,08,800/- किंमतीचा मांजा जप्त!

पुणे शहरातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात स trapsा लावून दोन युवकांना नायलॉन मांजा विक्री करताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोनो फिलगोल्ड कंपनीचा उच्च दर्जाचा नायलॉन मांजा जप्त केला असून त्याची किंमत तब्बल ₹1,08,800 इतकी आहे.

अटक आरोपी:

1️⃣ आयुष राहुल शिंदे (वय 20, रा. हडपसर)

2️⃣ यशराज विजय दिवेकर (वय 20, रा. हडपसर)

दोघांविरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 313/2025 विविध कलमान्वये तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल.

ही कारवाई मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, PI(गुन्हे) बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली P.S.I. युवराज पोमण व त्यांच्या तपास पथकाने केली.

पुणे पोलिसांकडून पतंगबाजीतील नायलॉन मांज्यावर कठोर कारवाई सुरूच!

#BreakingNews #PunePolice #MundhwaPolice #NylonManjaSeizure #CrimeUpdate #PuneCity


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!