दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची धडाकेबाज कारवाई! सातारा येथील दोन गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी पुण्यातून अटक!


🚨 ब्रेकिंग न्यूज – पुणे शहर 🚨

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची धडाकेबाज कारवाई!

सातारा येथील दोन गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी पुण्यातून अटक!

पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ने गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट एस.टी. स्टँड परिसरातून सातारा शहर पोलीस स्टेशनमधील दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपीला शिताफीने जेरबंद केले.

🔴 अटक आरोपी:

निखील अशोक काळे (वय 22 वर्षे)

रा. मातंग वस्ती, कोडोली, जि. सातारा

🔸 हा आरोपी सातारा शहर पोलीस स्टेशनमधील खालील दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता:

1️⃣ गु.र.नं. 927/2025 — भा.न्या.सं.क. 310(2), 119(1), 308(4), 115(2), 118(1), 352, 351(2)

2️⃣ गु.र.नं. 918/2025 — भा.न्या.सं.क. 79, 118(1), 3(5)

स्वारगेट परिसरात संशयितपणे फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ धाड टाकली आणि सापळा रचून आरोपीला पकडले. चौकशीत त्याने दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड केले.

अटक झालेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात सोपविण्यात आले.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पो. आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाई करणारे अधिकारी:

PI दत्ताराम बागवे, PSI वर्षा कावडे, अंमलदार बाळू गायकवाड, साईकुमार कारके, महेश पाटील, अमित गद्रे, नारायण बनकर, रिहाना शेख, साधना पवार.

पुणे पोलिसांची अचूक माहिती व जलद कारवाईमुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या!

#BreakingNews #PunePolice #CrimeBranch #DharodaAntiTheftSquad #WantedAccusedArrested #PuneCityPolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!