🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨
वाहतूक विभागातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत PSI लक्ष्मण नवगणे यांचा माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
पुणे शहर वाहतूक विभागात शिस्त, नियोजन आणि नागरिकाभिमुख कामकाजातून ठोस योगदान दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची वरिष्ठ पातळीवर प्रशंसा झाली.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या २ जानेवारी स्थापना दिन सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत गुरुवारी (८ जानेवारी) विमाननगर येथील सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल सभागृहात आयोजित मुद्देमाल वितरण समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला. त्याचवेळी PSI लक्ष्मण नवगणे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त हेमंत जाधव, निखील पिंगळे, सोमई मुंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या सन्मानामुळे पुणे शहर वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
#PSILaxmanNavgane #PuneTrafficPolice #AmitheshKumar #PunePolice #PoliceHonour #TrafficDiscipline #CitizenFriendlyPolice #MaharashtraPolice #BreakingNews 🚔








