🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨
घरफोडीचा गुन्हा उघडकीस — सराईत आरोपी जेरबंद!
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांची मोठी कारवाई.
घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. ०७/०१/२०२६ रोजी येरवडा येथील एस.जी. सुपरमार्केट व लेडीज टेलर दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या इसमाने
सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून पलायन केले होते.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०७/२०२६
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
दि. १८/०१/२०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीच्या आधारे
हडपसर माळवाडी येथून जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय ३९)
या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून —
🔹 १३८ ग्रॅम १९० मिली सोन्याचे दागिने
🔹 अॅक्टीव्हा स्कुटर
🔹 एकूण ₹१८,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत
आरोपीवर यापूर्वी पुणे शहर व रायगड जिल्ह्यात
घरफोडी व चोरीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही यशस्वी कारवाई —
मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे,
मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे–२) श्री. राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांच्या सूचनेनुसार
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–२ यांनी केली.
👏 पुणे पोलिसांच्या तत्पर व धडाकेबाज कारवाईमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.
🔖
हॅशटॅग्स:
#BreakingNews #PunePolice #CrimeBranchPune
#DacoityAndVehicleTheftUnit2 #HouseBreakingSolved
#GoldRecovery #CriminalArrested
#Yerwada #VishrantwadiPolice
#PuneCityNews #PoliceAction 🚔🔥








