🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨
वानवडी पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यात वानवडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी वानवडी पोलीस ठाण्याचे तपासपथक प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे वाहनचोरी व इतर गुन्हे रोखण्यासाठी सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना ही कारवाई करण्यात आली.
पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार ८७०३ कांबळे व १०३१० वाघमारे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, बुधानी वेफर्स कंपनीसमोरील मोकळ्या जागेत, दोन तरुण इसम निळ्या व काळ्या रंगाच्या अॅक्टीवा गाड्यांवर संशयास्पदरित्या थांबले असून त्या गाड्या विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदर वाहनचोरीची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार तपासपथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचत दोन इसमांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून
🔹 निळ्या रंगाची अॅक्टीवा क्र. MH 12 VN 8035
🔹 काळ्या रंगाची अॅक्टीवा क्र. MH 12 YV 5146
या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. चौकशीत सदर वाहने वानवडी परिसरातून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच त्यांनी आणखी एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा क्र. MH 11 DW 8824 चोरी केल्याचे सांगितले. मात्र ती गाडी पोलिसांची असल्याचे समजताच त्यांनी ती पुन्हा फिर्यादीच्या राहत्या घराजवळ पार्क केल्याचेही निष्पन्न झाले.
पुढील तपासात संबंधित आरोपी हे अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने ते विधिसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात त्यांनी केवळ हौसेपोटी तसेच चोरीची वाहने विकून काही पैसे मिळतील या उद्देशाने वाहनचोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात वानवडी पोलीस ठाणे हद्दीत एकूण ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून ते पुढीलप्रमाणे आहेत —
1️⃣ गु.र.नं. ३९९/२०२५ — भा.न्या.सं. कलम ३०३(२)
2️⃣ गु.र.नं. ४८२/२०२५ — भा.न्या.सं. कलम ३०३(२)
3️⃣ गु.र.नं. ४१९/२०२५ — भा.न्या.सं. कलम ३०३(२)
ही उल्लेखनीय कामगिरी श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर), श्रीमती नम्रता देसाई (सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग), श्री. भाऊसाहेब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) व श्रीमती संगीता जाधव (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्यासह तपासपथकातील
दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, आबासाहेब वाकसे, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण
या सर्व अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
🚔 वानवडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहनचोरीसारख्या गुन्ह्यांना मोठा आळा बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.
🔥
#BreakingNews Hashtags
🔥
#BreakingNews #PunePolice #WanwadiPolice #VehicleTheftBusted
#ActivaChori #CrimeNews #PuneCity #PoliceAction
#JuvenileCrime #LawAndOrder #Ramtekdi #Hadapsar
#AlertPolice #PublicSafety #CrimeFreePune 🚨








