🚨 ब्रेकिंग न्यूज – पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 🚨
काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी अवघ्या ०४ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील नायजेरीन आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे.
दि. १२/०१/२०२६ रोजी सकाळी ०६.०० वाजता पिसोळी परिसरात नायजेरीन युवक येमेका क्रिस्टीएन (वय ३८) याच्यावर त्याच्याच मित्रांनी प्रेमप्रकरणाच्या वादातून निर्घृण मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यास रुबी हॉस्पिटल, वानवडी येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर काळेपडळ पोलीस ठाणे गुन्हा र. नं. ११/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ ३ विशेष पथके तयार करण्यात आली.
२५ ते ३० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी येवलेवाडी, पिसोळी व कॅम्प परिसरात लपल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी छापा टाकून खालील ३ नायजेरीन आरोपींना ताब्यात घेतले –
➡️ जॉनपॉल ओबिन्ना मोनेके (ओबी) – वय ३७
➡️ नायेमेका मादूबुची ओनिया – वय ४२
➡️ ओजेंग्वा – वय ४०
तपासात “मयत युवक हा आरोपींच्या मैत्रिणीशी बोलत असल्याने निर्माण झालेल्या वादातूनच हा खून केल्याची” कबुली आरोपींनी दिली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी
मा. पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि विलास सुतार, अमित शेटे, रत्नदीप गायकवाड, विनायक गुरव, पूजा पाटील व पथकातील पोलीस अंमलदारांनी केली आहे.
🔖 Hashtags
#PunePolice
#KalepadalPolice
#MurderCaseSolved
#PoliceAction
#SwiftJustice
#CrimeNews
#PuneBreaking
#LawAndOrder
#PuneCityPolice








