पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांची मोठी कारवाई करत विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद केला आहे.


🚨 ब्रेकिंग न्यूज | वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर 🚨

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांची मोठी कारवाई करत विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद केला आहे.

दि. १३ जानेवारी २०२६ रोजी गुप्त बातमीच्या आधारे वाघोली ते केसनंद रोडवर सापळा रचून पोलिसांनी एमएच ३८ एक्स २८२२ या पिकअप वाहनाची तपासणी केली. वाहनात काळ्या ताडपत्रीखाली लपवून ठेवलेल्या ७,४४१ विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या.

👤 आरोपीचे नाव – कपील दिगंबर शाहू (वय २६), रा. लाडबावस्ती, केसनंद, मूळ रा. आंदेगाव, ता. मुखेड, जि. नांदेड

📦 जप्त मुद्देमाल –

➡️ १६,७३,८४५/- रु. किमतीची विदेशी दारू

➡️ ७,००,०००/- रु. किमतीची पिकअप गाडी

💰 एकूण जप्त मुद्देमाल – ₹ २३,७३,८४५/-

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वाघोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या सूचनेप्रमाणे पार पडली.

🔖 Hashtags

#BreakingNews #WagholiPolice #PunePolice #IllegalLiquor #LiquorSeizure #PMC_Election2026 #ElectionAlert #CrimeNews #PoliceAction #Wagholi #PuneCity #MaharashtraPolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!