🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨
वानवडी वाहतूक विभागाच्या पोलीस अंमलदारांची कौतुकास्पद कामगिरी – महिलेचा जीव वाचवला!
दि. ०९/०१/२०२६ रोजी दुपारी १ वाजता गोळीबार मैदान चौक येथे अंदाजे ३३ वर्षीय महिला नयना जाधव दुचाकीवरून जात असताना अचानक खाली पडून बेशुद्ध झाली. घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या
👮♀️ महिला पो. हवा ११९० मिनाक्षी आनंदा राठोड
👮♀️ मपोशी ४२९३ प्रियांका अजित गालिंदे
👮♂️ पोशी ८५३९ प्रकाश अशोक माने
यांनी क्षणाचाही विलंब न करता अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता, रिक्षा थांबवून बॅरीकेट बाजूला काढले व राँग साईडने तात्काळ मार्ग करून महिलेस सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्यात यश मिळवले.
🙏 पुणे पोलिसांच्या या धाडसी आणि माणुसकीपूर्ण कार्याला सलाम!
#Hashtags
#BreakingNews #PunePolice #WanowrieTrafficPolice #BraveCops #HumanityFirst #QuickAction #LifeSaved #PoliceHeroes #GoliBarMaidaanChowk #PuneCity #ProudMoment 🚔👏








